एक जानेवारी २००० : नव्या सहस्त्रकाची सुरुवात. सर्व जग या सहस्त्रकाच्या स्वागतासाठी सज्ज होते. पूर्वेकडील देशांत या सहस्त्रकाची सुरुवात होणार असल्याने अनेक पाश्चात्य देशातील नागरिकांनी पोर्वेकडील देशांकडे धाव घेतली होती. मी मात्र सुदैवाने माझ्या प्रोजेक्टसाठी पूर्वेकडील हॉंगकॉंग या देशातच होतो.
आम्ही तेथील एका पंचतारांकित हॉटेलात कंपनीच्या खर्चाने काही महिने राहत होतो. तेथील विद्युत पुरवठा कंपनीमध्ये SAP चालू करायचे होते आणि त्यासाठी मी तेथे गेलो होतो. एक जानेवारीलाच तेथे SAP ची सुरुवात होनार होती.
१९९९ चा ख्रिसमस चालू झाला. Hong Kong मध्ये पर्यटकांची गर्दी उसळली होती. प्रत्येक हॉटेल आपल्याकडे जास्तीतजास्त पर्यटक ओढण्याचा प्रयत्न करीत होते. आमच्या हॉटेलने छान शक्कल लढविली.
३१ डिसेंबरच्या रात्री पार्टीमध्ये हॉटेल समोरील कारंज्यात पाण्याऐवजी वाईन भरण्याची घोषणा केली. रात्री प्रत्येकाने वाईनच्या कारंज्यातून हवी तेवढी वाईन घेईन प्यावी. या पार्टीसाठी गलेलठ्ठ तिकीट आकारलेले होते. पण आम्हाला (अनेक महिने त्या हॉटेलमध्ये राहत असल्याने) त्या पार्टीचे मोफत पासेस दिले होते. आम्ही या वाईन कारंज्याचे स्वप्न रोज बघत होतो.
३१ दिसेम्बाराचा दिवस आला. एक तारखेला SAP चे Go-Live होते. संगणक प्रणालीत Y2K मुळे गोंधळ झाल्यास संपूर्ण Hong Kong चे लाईट जाण्याचा आणि परदेशी पर्यटकांच्या उत्साहावर पाणी पडण्याची शक्यता होती. त्यामुळे आम्हाला जोपर्यंत SAP पूर्णपणे कार्यान्वित होत नाही तो पर्यंत कंपनीतच थांबण्यास सांगण्यात आले. आम्ही सतत घड्याळाकडे बघत होतो. रात्री बारा वाजता बाहेर काय धमाल चालू असेल याची केवळ कल्पना करीत होतो. हॉटेलमधील वाईनचे कारंजे आमच्या डोळ्यासमोर थुई थुई नाचत होते. SAP कार्यान्वित होण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यास सकाळचे सात वाजले. आम्ही हॉटेलवर गेलो तेव्हा पार्टी संपली होती. युरोपमध्ये नव्या वर्षाची सुरुवात होत होती ते TV वर दाखवीत होते. TV बघत स्वत:चे समाधान करून घेतले.

संध्याकाळी काम संपवून आम्ही सर्व त्या मॅनेजरच्या घरी गेलो. त्याने त्याचे घर दाखविले. नंतर आम्ही जेवणाच्या टेबलावर आलो. घरात बूट घालून जेवण करणे हेच मला कसेतरी वाटत होते. जेवणाच्या आधी सर्वांनी एकमेकांच्या हातात हात घालून प्रार्थना केली. ती ही अर्थात बूट घालूनच. नंतर मला प्रोजेक्ट मॅनेजरच्या पत्नीने सांगितले की तिने माझ्यासाठी veg जेवण केले आहे. मी परत सांगितले की मी सर्व प्रकारचे मांस आवडीने खातो. परंतु ते तिला पटले नाही. तिने कोठलेही non-veg पदार्थ मला वाढण्यास चक्क नकार दिला. मला बाटविण्याची तिची इच्छा नसल्याचे तिने आवर्जून सांगितले. 'आलिया भोगासी असावे सादर' म्हणत समोर दिसणाऱ्या चमचमीत पदार्थांकडे मी फक्त आशाळभूतपाने पहात राहिलो. माझ्यासाठी कोर्नसूप बनविले असल्याचे तिने सांगितले. नंतर त्या कोर्न सूप वरील झाकण उघडून त्यातून तिने मोठा चिकन लेग बाहेर काढला. केवळ कोर्नसूपला स्वाद येणार नाही म्हणून तिने तो स्वादासाठी त्यात टाकल्याचे स्पष्टीकरण दिले. परंतु तो मला देणार नसल्याचेही सांगितले. या प्रकाराने मी हतबुद्ध झालो. जर एखादा खरोखरच शाकाहारी माणूस तेथे असता तर त्याने काय केले असते हा विचार मनात आला. हा माझा अमेरिकन माणसाच्या घरी जेवणाचा (veg का non-veg??) पहिला अनुभव !