पत्ता शोधणे ही एक कला आहे. विशेषत: नव्या देशांत कधी कधी हे फारच कठीण होते.
माझा होंग कोंग मधील पहिला दिवस. संध्याकाळच्या सुमारास मी माझ्या हॉटेलवर पोचलो. हॉटेल एका मेट्रो स्टेशनच्या वर होते. मी हॉटेलवर चेक इन केल्यावर संध्याकाळी आसपासचा परिसर पाहण्यास निघालो. हॉटेल
मेट्रो स्टेशनच्या वरच असल्याने निवांत होतो. मेट्रो स्टेशनचे नाव लक्षात ठेवले. आता चिंता नव्हती.
चालत थोडा दूर गेलो. माझ्या कधी रस्ती लक्षात रहात नाहीत. परत हॉटेलकडे जाण्यासाठी निघालो. रस्त्यावरील लोकांना स्टेशन कोठे आहे ते विचारले. पण अर्ध्या लोकांना इंग्रजी येतच नव्हते. ज्याना येत होते त्यांनी मला विचारले, 'कोणती लाईन?'. हे स्टेशन मेट्रोच्या दोन लाईन्सवर होते आणि दोन्ही स्टेशनमध्ये अंतर होते. मी गोंधळलो. पण सुदैवाने मला त्या लाईन चा रंग आठवला. मग पुढील प्रश्न आला 'कोणते एक्झिट'. हे स्टेशन लांबवर पसरले होते आणि जमिनीखाली अनेक रस्त्यांना छेद देत होते. त्यामुळे त्याची अनेक exits होती आणि ती निरनिराळ्या रस्त्यांवर उघडत होती. मुंबईशहरात राहणाऱ्या मला हे नवीनच होते. मला वाटले होते की फक्त स्टेशनचे नाव लक्षात ठेवले की पुरेसे आहे.
शेवटी माझ्या स्मरणशक्तीचा उपयोग करून मी माझे हॉटेल शोधून काढले.